आपल्या परिसर स्वच्छ हरीत ठेवण्याच्या दृष्टीकोनातून व पर्यावरण मित्र बनविण्याचे फायदे जाणून समतोल पर्यावरण राखण्यासाठी
गट पद्धतीने वृक्षारोपण तसेच भव्य वृक्ष दिंड्या याचे आयोजन सातत्याने केली जाते. कर्मात जीव ओतून कर्मयोग साधत केलेल्या वॉर्डाच्या सर्वागीण विकासामुळेच अनेक मोठ मोठे प्रकल्प वॉर्डात साकारले आहेत व पुढेही होणार आहेत.तीन अत्यंत नामांकित इंग्लिश मिडीयम स्कूल दोन महाविद्यालय,अशोका हाउस इनस्टीट्युट चार्टड अकाऊंट ऑफ इंडिया,वेस्कॉन(VASCON) आय .टी पार्क इ.सर्व बाबींमुळे आपला प्रभाग शैक्षणिक व व्यावसायिक दृष्ट्या मानबिंदू ठरलेला आहे .याचा मला आनंद व अभिमान वाटतोय.