सप्रेम नमस्कार ,

सन१९९७ मध्ये प्रथमत आपण माझ्या गळ्यात विजयाची माळ घालून माझ्यावर विश्वास दाखवला आणी मला नाशिक मनपात आपले नेतृव करण्याची संधी मला दिली आपला पाठींबा, सहकार्य, प्रेम व सदिच्छा यांच्या बळावर सर्वप्रथम आपला वॉर्ड वीज, पाणी, रस्ते गटारी इत्यादी सुविधांनी परिपूर्ण केला ते करत असताना त्याबरोबरच इतरही अनेक कामाचे सूत्रबद्ध नियोजनही केले. माझ्या कामाचे योग्य मूल्यमापन करून आपण सन २००२ मध्ये विशेषतः तीन वॉर्डचा एक प्रभाग झाला असतानाही द्वितीय क्रमांकाच्या विक्रमी मतांनी विजयी केले. आपल्या सर्वांच्या भरघोस पाठीब्या मुळे माझी कामाची उमेद द्विगुणीत होत आलेली आहे.

एक स्वप्नदर्शी कार्यकर्ता व पूर्ण जिद्दीने भव्य स्वप्न साकार करण्याची उमेद बाळगून मी ३० वर्षेपासून कार्यरत आहे. माणुसकीचा धर्म मानत असल्याने समभाव वृत्ती जोपासून प्रथम बांधिलकी समाजसेवेसाठी ठेऊन वेळ व काळाचे बंधन कधीच न मानता सातत्याने चांगल निर्माण करण्याचा व चांगल देण्याचा प्रयत्न करीत आहे.

आपला प्रभाग हा अत्यत विस्तृत व भौगोलिक दुर्ष्ट्या इथःस्त विखुरलेला असल्याने प्रत्येक कुटुंबाशी संपर्क साधने जरी जिकरीचे काम असले तरी विविध योजनाच्या माध्यमातून मी प्रभागाच्या कानाकोपऱ्या पर्यंत विकासाची गंगा पोहचवली आहे.आपणाशी वेळोवेळी संवाद साधताना आपल्या आपेक्ष्या, अडी आडचणी सूचना मार्गदर्शन व सातत्याने मिळणारे आपले सहकार्य या मुळे प्रत्येक भागातील जनसामांन्यांची निकड लक्ष्यात घेऊन नव्या, जुन्या अशा दोन्ही भागांमध्ये विकासाचा समतोल राखला.माझे काम योग्य गतीने व दिशेने सुरु आहे याची मला ग्वाही देत आपण सर्वांनी मला सन २००७ मध्ये पुन्हा एकदा विजयी करून माझ्या विकास स्वप्नांना आपल्या आशीर्वादाने मजबूत पंख दिले.

प्रभागाचा विकास होत असताना आपणाशी वेळोवेळी हितगुज साधून सांस्कृतिक व भावनिक ऋणानुबंध अधिक घट्ट होत गेले. प्रभागातील आगदी कोणालाही संपर्कासाठी माझे निवासस्थान कायम खुले राहिले आहे. त्याच प्रमाणे आपल्या प्रभागातच नाही तर कुठेही कोणत्याही सामाजिक समारंभात भेटणाऱ्या प्रतेकाला नेहमीच उपलब्ध राहिलो आहे. सर्व राजकीय मत मतांतर बाजूला ठेऊन पक्षभेद जातीभेद,धर्मभेद गरीब श्रीमंत असा कुठलाही भेदभाव न करता प्रभागातील प्रत्येकाशी समरस होत परिसरात सर्व दूर शांतता एकोप्याचे व मांगल्याचे वातावरण प्रस्थापित करण्याचा सातत्याने प्रयत्न केला व त्यात यशस्वी झालो याचे मला समाधान आहे .

महापालिकेवर काम करत असताना अनंत अडचणी असतात. वरिष्ठ अधिकार्यांना आपली बाजू पटवून देवून विकास साधने जिकरीचे काम आहे. काहीवेळेस मानसिक क्लेश होतात. पण मनाने घेतलेला सर्वागीण विकासाचा ध्यास शांत बसू देत नाही. मला जे सांगायच होत,बोलायचं होत,जो परिसराचा कायापालट करून विकास केलेला आहे. व पुढेही होणार आहे तो सर्व लेखाजोखा होणाऱ्या कामांचा अहवाल, झालेल्या कामांच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवला आहे. प्रभागातील वर्तमान समस्या सोडवतांना त्याची भविष्याशी सांगड घालत माझे कर्तव्य प्रमाणिकपणे पूर्ण केलेले आहे.

आदर्श प्रभाग बनवण्याचे स्वप्न उराशी बाळगून सातत्याने कार्यरत असताना आता ते स्वप्न पूर्णत्वाकडे जाताना बघताना मला मनस्वी समाधान लाभत आहे. ह्याच पाऊलवाटेवरून पुढे जात असताना आपणच माझ्या कर्तुत्वाचे उर्जाकेंद्र आहात.

माझ्यासाठी आपण सर्वच प्रभागाचा विकासाचे हजारो हात राहिला आहात. आपण आजवर माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठेवत माझी वाटचाल प्रभागाच्या विकासाच्या वाटेवरून आपल्या सर्वांच्या साथीने या पुढे सुरूच राहील.आपले लाखमोलाचे आशीर्वाद भावी वाटचालीसाठी लाभावे हीच अपेक्षा आहे !प्रभागाच्या प्रगती आलेख उंचवण्यासाठी हेच पाठबळ पुरेसे आहे .

''भविष्यकाळाचे भविष्य ठरवताना क्षणभर थाबुन अंतर्मुख व्हा अन वेध घ्या विकासाचा !शेवटी जागृत मतदार हाच समर्थ लोकशाहीचा खरा आधार आहे .

धन्यवाद!
आपला

सतीश कुलकर्णी