सर्वसामन्यांसाठी काम करण्याची इच्छा निश्चित कार्य करण्यास पाठबळ देते.सार्वजनिक आरोग्य उत्तम असले कि समाजाची प्रगती वेगाने होते अर्थात ही सगळ्याची सामुहिक जबाबदारी आहे. रक्तदान शिबीर,मोफत आरोग्यनिदान शिबीर, दंतचिकित्सा शिबीर, योग प्राणायाम विज्ञान शिबीर, महिलांसाठी आरोग्याची निगा शिबीर, या सारख्या उपक्रमांमुळे जनजागृती केली व सार्वजनिक आरोग्याचा तोल सांभाळण्याचा प्रयत्न केला.